Sunday, June 7, 2020

४) रे थांब जरा आषाढघना

कविता क्रमांक 
                    ४)  रे थांब जरा आषाढघना...
                                  बा.भ. बोरकर_


            निसर्गाचे सौंदर्य अनुभवायचे असेल तर आषाढ मेघांनी क्षणभर थांबावे आणि निसर्गात त्यांनीच घडवली रंगीबिरंगी जादुई किमिया पाहण्याची इच्छा कवीने व्यक्त केली आहे.
              प्रस्तुत कवितेत कवींनी निसर्गासोबत सुखसंवाद साधण्याची इच्छा या कवितेतून व्यक्त केली आहे. आषाढ महिन्यातील पाउस नुकताच पडून गेला आहे आणि निसर्ग हिरवळीने ओथंबलेला आहे. सगळीकडे हिरवाई च्या नाना छटा दिसून येतात आणि हेच निसर्गसौंदर्य कवीला अनुभवायचा आहे डोळे भरून पाहायचा आहे, या उत्कट इच्छेपाई आकाशातील पाण्याने गच्च भरलेल्या ढगाला आषाढघन या नावाने हाक मारून त्याला थोडा वेळ थांबण्याची विनंती करीत आहे. याच पावसाने मुक्तहस्ताने उधळलेले सौंदर्य मला डोळे भरून पाहू दे अशी इच्छा कवी आषाढघना कडे व्यक्त करतो.
            शेतातल्या पिकाबद्दल कवी बोलताना सांगतात की, भूईतून वर आलेली रोपे पाचू  ( हिरव्या रंगाची रत्न) प्रमाणे दिसतात हेच हिरव्या रंगाची रोपे कवीला आपल्या डोळ्यांनी पाहायचे आहे ही शेतातली माती कणीदार लालसर आहे व त्यावर नांगरणी चालू आहे शेतकरी मशागत करत आहे .निळ्या रंगाचे रत्न म्हणजेच बांबूच्या बेटांना कवी (निळ्या रंगाची रत्न)अशी उपमा देतो आणि हे सगळ निसर्गाचे जे रूप आहेत या तुझ्याच पाऊल खुणा आहेत हे मला पाहायचे आहेत म्हणून कवी आषाढ घनाला विनंती करतो की थोडावेळ थांब.
              त्याचबरोबर केवढ्याची पानं म्हणजेच केतकीला सुद्धा आनंद झाला आहे आणि ती आनंदाने रोमांचित झाली आहे, सोनचाफा ही फुलून आला आहे आणि जाईच्या या नाजूक कळ्या त्या म्हणजे जणू त्याच्या लेकीच. जणू नुकत्याच तारुण्यात प्रवेश केलेल्या अल्लड युवतीच. त्याही पुन्हा पुन्हा लाजून पाहत आहेत आणि  हे सगळं  कवीलाही पाहायचा आहे त्यासाठी पाऊस थांबायला पाहिजे अशी विनंती कवी करतो.
               हे घना थोडा वेळ विश्रांती घे आणि वासरमणि  म्हणजेच सूर्याच्या घराचे दार उघड आणि निसर्गाने मुक्तहस्ते उधळलेल्या या जादूई सौंदर्यावर हळदीचे कोवळे ऊन
अलगत वाहु दे. त्यासाठी हे आषाढघन तू थोडा वेळ उघडीप घे.
              पोस्टीक दुधाने कणसे भरून जाऊदे आणि फुलांचे देठ हे हलके मधानी भरावे हे सर्व पाहून पक्षी मधुर गाणे गाऊ लागतात तेव्हा गवताच्या पात्यावर उठलेला आनंदाचा शहारा कवीला जाणवतो आहे.
          अश्लेशा नक्षत्रामध्ये श्रावण महिना येतो व या महिन्यात पडतो रिमझिम पाऊस पडतो या पाऊस आला कवी तुषारस्नान असं म्हणतो या तुषारस्नानात उडत असलेली फुलपाखरे मध्यान्हा च्या वेळी कवीला तेजस्वी रत्ने उडत असल्याचा भास होतो इंद्रवर्णात-( इंद्रधनुष्याचा) सप्तरंगात न्हाऊन निघालेली रंगीबिरंगी फुलपाखरे कवीला पाहावयाचे आहे. त्यासाठी आषाढी घणांनी थांबावे असे कवीला वाटते.
         आता अंधार पसरला आहे रात्र झाली अशा या शांत वातावरणात चमचमणाऱ्या काजव्यांचे प्रकाश फुले आणि पाण्यात पडणाऱ्या चंद्रबिंबाशी संवाद साधायचा आहे.... त्यासाठी मेघांनी क्षणभर विश्रांती घ्यावी अशी विनंती कवी करतो.


 कवितेतील शब्दार्थ : 

१ ) धन - ढग , २ ) दिठी - दृष्टी , ३ ) *करूणा* - दया , ४ ) *कोमल* - नाजुक , ५ ) *पाचू* - हिरव्या रंगाचे रत्न , ६ ) *प्रवाळ* – पोंवळे , ७ ) *औत* - नांगर , ८ ) *इंद्रनीळ* - निळ्या रंगाचे एक रल , ९ ) *वेळूची* बेटे - बांबुचे बन , १० ) *पदविन्यासखुणा* - पाऊलखुणा , ११ ) *रोमांचित* – अतिशय आनंदाने अंगावर उठणारा काटा , १२ ) *गंध* - सुवास , १३ ) *केतकी* - केवडा , १४ ) *फुटे फुली* - फुलून येणे , १५ ) *सोनपंचक* - सोनचाफा , १६ ) *जाईच्या लेकी* - जाईची फले . १७ ) *गगन* - आकाश . १८ ) *घडिभर* - थोडावेळ , १९ ) *आसर* – पावसाळ्यातील उघडीप , २० ) *खुले करणे* – उघडणे , २१ ) *वासरमणि* - सूर्य , २२ ) *किमया* – जादू , २३ ) *हळदुव्या उन्हा –* हळदीच्या रंगासारखे ऊन , २४ ) *जिवस* – पौष्टिक , २५ ) *अरळ* - अलवार , मृदु , हलके , २६ ) *कंठ* – गळा , २७ ) *खग* - पक्षी , २८ ) *मधुगान* - मधूर गायन , २९ ) *शहारा* - रोमांच , ३० ) *तृणपर्ण* – गवताचे पाते , ३१ ) *आश्लेषा* – २७ नक्षत्रांपैकी एक , ३२ ) *तुषार* - पाण्याचे उडणारे थेंब , ३३ ) *रत्नकळा* – रत्नांची तेजस्वी छटा , ३४ ) *माध्यान्ह* – दुपारची वेळ , ३५ ) *इंद्रवर्ण* – इंद्रधनुष्याचे सात रंग , ३६ ) *वन* – जंगल , ३७ ) *काळोख* – अंधार , ३८ ) *आसवे* – अश्रू , ३९ ) *पालवणे* - प्रकाशमान होणे , ४० ) *हितगुज* - सुखसंवाद , ४१ ) *निरखीत* – निरीक्षण करीत , ४२ ) *जळ* – पाणी , ४३ ) *विधुवदना* – चंद्रबिंब

No comments:

Post a Comment